गुरुनानक कॉलेजचे ५० विद्यार्थी विधान भवनात
गुरू नानक कॉलेजचे ५० विद्यार्थी विधान भवनात
प्रश्नोत्तर तास व मंत्र्यांच्या भाषणांचे केले प्रत्यक्ष निरीक्षण
धारावी, ता. ३ (बातमीदार) ः गुरू नानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त), सायन, मुंबईच्या राज्यशास्त्र विभाग, संविधान क्लब आणि निवडणूक साक्षरता क्लबच्या ५० विद्यार्थ्यांनी विधान भवनाला भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विधानसभेच्या दोन्ही सभागृहांचे दर्शन घडले, तसेच महाराष्ट्राची अर्थसंकल्प सत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी मिळाली.
राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुमीत खरात यांच्या संकल्पनेने आयोजित या अभ्यास दौऱ्याचे समन्वय संविधान क्लब समन्वयक प्रा. अनिकेत उबाळे यांनी उत्तमरीतीने केला. विधान भवनात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांना विधानमंडळाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली गेली. विधानसभेच्या सभागृहात बसून अर्थसंकल्प सत्रातील चर्चा आणि निर्णयप्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून घेण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे मर्म आणि विधायी प्रक्रियेची बारकावे समजण्याची मौल्यवान संधी मिळाली.
प्रा. सुमीत खरात म्हणाले, हा भेटप्रवास विद्यार्थ्यांना संविधानिक संस्थांच्या कार्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा आहे. यातून ते राजकीय प्रक्रियेच्या वास्तविकतेला परिचित होतील आणि त्यांच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल. प्रा. अनिकेत उबाळे यांनी सांगितले, संविधान क्लब आणि निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून अशा उपक्रमांची सातत्यपूर्ण योजना आखली आहे, ज्यामुळे विद्यार्थी सक्रिय नागरिक म्हणून घडतील.
या भेटीत विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या सत्रातील प्रश्नोत्तर सत्र आणि मंत्र्यांच्या भाषणांचे निरीक्षण केले. महाविद्यालय प्रशासनाने या उपक्रमाला प्रोत्साहन दिले असून, भविष्यात असे आणखी अभ्यास दौरे आयोजित करण्याची योजना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

