मार्वे रोड पठारे वाडीत २३ बेकायदेशीर गोदामांवर कारवाई;
मार्वे रोड पठारेवाडीत २३ बेकायदा गोदामांवर कारवाई; २५ हजार चौरस फूट जमीन मोकळी
मालाड, ता. १ (बातमीदार) : मालाड येथील मार्वे रोडवरील पठारेवाडी परिसरातील बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई करत बृहन्मुंबई महापालिकेच्या पी/उत्तर विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने २३ बेकायदा गोदामे पाडली. या कारवाईत सुमारे २५ हजार चौरस फूट सरकारी व खासगी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
ही गोदामे चित्रपट व लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य साठवण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. झोन चारच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे, पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सहाय्यक अभियंता राजेश सोनवणे आणि उपअभियंता सुहास घोलप यांनी पथकाचे नेतृत्व केले. कारवाईदरम्यान दोन जेसीबी मशीन, १६ अधिकारी आणि ३० कामगार सहभागी होते. नियोजनबद्ध आणि जलदगतीने पार पडलेल्या या मोहिमेत सर्व २३ गोदामे जमीनदोस्त करण्यात आली.
मुंबईत कोणत्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपायुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिला. अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

