मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः पुणे विद्यार्थी गृह यांच्या विद्याभवन हायस्कूलच्या इंग्रजी विभागांतर्गत मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, मुख्याध्यापिका लता नायर, पर्यवेक्षक प्रकाश पवार, समन्वयक सरला नरेंद्रन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीत, नाटिका आणि प्रभावी भाषणांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गोडवा सादर केला. मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून मराठी वाङ्मय आणि कुसुमाग्रजांच्या साहित्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू अशा चार गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत ‘वायू’ गट विजयी ठरला. कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्य कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करताना अशा मंडळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळते व त्यांच्यातील कला विकसित होण्यास चालना मिळते, असे सांगितले. तसेच मराठी वाङ्मय मंडळ आणि सर्व मराठी विषय शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
ज्येष्ठ शिक्षिका लीना शिंदे आणि मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख मीना गायकवाड यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांची पुस्तके बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख मीना गायकवाड व सर्व मराठी विषय शिक्षकांचे आभार मानले. उपस्थित मान्यवर, सहभागी विद्यार्थी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करत ‘ही मायभूमी ही कर्मभूमी’ या सुमधुर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

