समता विद्या मंदिर शाळेत ग्रंथ दिंडी सोहळा उत्साहात

समता विद्या मंदिर शाळेत ग्रंथ दिंडी सोहळा उत्साहात

Published on

‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’
समता विद्या मंदिर शाळेत ग्रंथ दिंडी सोहळा उत्साहात
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या घोषवाक्याने वातावरण दुमदुमून गेले असताना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत ग्रंथ दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संतांनी रचलेल्या विविध ग्रंथांची दिंडी शाळेच्या प्रांगणातून काढली.
मराठी भाषेचा वारसा आणि संत साहित्याचे महत्त्व नव्या पिढीला कळावे, या उद्देशाने शाळेच्या प्रांगणातून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. इनामजप करत, पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला होता. संत वीरांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी साकारलेले रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हाती घेतलेल्या टाळ-मृदंगाचा गजर आणि संतांच्या ग्रंथांची पालखी यामुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तीमय झाला होता.
या दिंडीत पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेचे सचिव राजेश सुभेदार आणि कार्याध्यक्ष ज्योती सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मराठी भाषा गौरव उत्सव उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे शाळेचे सचिव राजेश सुभेदार यांनी सांगितले. हा गौरव सोहळा साजरा करण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख भरत भोई, वैशाली हांडे, प्रतीक्षा गोरे, नीलम डीमेलो आदी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com