नवी मुंबईत ‘नगरसेवक आपल्या दारी’
वाशी, ता. २८ (बातमीदार) : नागरिकांच्या समस्या तत्काळ आणि थेट पद्धतीने सोडवण्यासाठी नवी मुंबईत महाराष्ट्रातील पहिल्यांदाच राबविण्यात येणाऱ्या ‘नगरसेवक आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात झाली. अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लोकाभिमुख उपक्रमाची सुरुवात रबाळे गावातून करण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमधील नगरसेवक, तसेच नवी मुंबई युवा सेनेचे जिल्हाप्रमुख असलेल्या अनिकेत म्हात्रे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू झाला आहे. दर गुरुवारी नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर प्रत्यक्ष संवादातून तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडले. ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, वीज, पथदिवे, रस्ते, वाहतूक, कायदा-सुव्यवस्था, उद्याने, तसेच विविध शासकीय योजनांबाबतच्या समस्या नागरिक थेट मांडू शकणार आहेत. पारंपरिक तक्रार नोंदणीच्या प्रक्रियेऐवजी प्रत्यक्ष संवाद आणि तत्काळ निर्णय हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

