बाजारपेठांमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह
बाजारपेठांमध्ये शिमगोत्सवाचा उत्साह
पालघर, ता. १ ः बाजारपेठेत आज शिमगोत्सवाचा उत्साह दिसून आला. होळी रंगासह आकर्षक रंग, पिचकाऱ्यांसह होलिका पूजनासाठी विविध पूजा साहित्याबरोबर रंगबिरंगी टी-शर्ट्स बाजारात उपलब्ध झाल्याने लहानग्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
ग्रामीण भागात होळीला दोन-चार दिवसआधी सुरुवात होते. लहान होलिका दहनाला जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. मात्र, धुळवडीला खऱ्या अर्थाने सर्वत्र उत्साह दिसतो. धुळवडीसाठी जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, रंगांनी सजल्या आहेत. विविध रंग, फुगे, पिचकाऱ्या खरेदीसाठी बच्चे कंपनी गर्दी करताना दिसत आहे. छोटी बंदूक, प्रेशर गन, पाठीवरील पिचकाऱ्या ५० रुपयापासून हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कार्टूनच्या आकाराची पिचकाऱ्याची लहानग्याना भुरळ पडत आहे. तर यंदा रासायनिक रंगाएवजी नागरिक नैसर्गिक रंगांना प्राधान्य देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

