प्रेमसंबंधातून घरात घुसून चाकू हल्ला

प्रेमसंबंधातून घरात घुसून चाकू हल्ला

Published on

ठाण्यात प्रेमसंबंधातून पती-पत्नीवर चाकूहल्ला
ठाणे, ता. २८ ः वर्तकनगर परिसरातील लोकमान्यनगर भागात एका सुरक्षा सुपरवायझरने प्रेमसंबंधातील वादातून पती-पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आम्ही पोलिस आहोत, असे खोटे सांगून आरोपीने घरात प्रवेश मिळवला आणि चाकूहल्ला केला.

तक्रारदार हे शिलाईकाम करतात. त्यांच्या पत्नी काही महिन्यांपूर्वी माजिवडा येथील एका मॉलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होत्या. तिथे त्यांची ओळख सुरक्षा सुपरवायझर शेषराव गंगाराम लिहारकर याच्याशी झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब पतीला समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाले. परिणामी, पत्नीने काम सोडून दिले आणि आरोपीशी संपर्क तोडला. संपर्क तोडल्याचा राग मनात धरून आरोपीने गेल्या दोन दिवसांत दोनदा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (ता. २६) लिहारकर याने तक्रारदाराच्या पत्नीला रस्त्यात अडवून मारहाण केली, ज्याची नोंद वर्तकनगर पोलिस ठाण्यात झाली होती. त्यानंतर शुक्रवारी (ता. २७) आरोपीने तक्रारदाराच्या घरी जाऊन आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी केली. घरचा दरवाजा उघडताच त्याने तक्रारदारावर चाकूने वार केले. पतीला वाचवण्यासाठी पत्नी मध्ये पडली असता आरोपीने त्यांनाही बेदम मारहाण केली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरून शेषराव लिहारकर याच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com