छत्रपती व आंबेडकर स्मारक  कधी पूर्ण करणार

छत्रपती व आंबेडकर स्मारक कधी पूर्ण करणार

Published on

स्मारक कधी पूर्ण करणार?
काँग्रेसचा भाजपला सवाल
मुंबई, ता. २८ ः भाजप महायुतीचे सरकार भरमसाट आश्वासने देते, पण त्यातील एकही पूर्ण करत नाही. निवडणुकीच्या तोंडावर घोषणाबाजी करून जनतेची फसवणूक केली जाते आणि ते तर चुनावी जुमले होते, असे सांगून जबाबदारी झटकतात. भाजपच्या घोषणा म्हणजे ‘लबाडा घरचे जेवण’ अशी टीका करून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण करणार, असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी विचारला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये जलपूजन करण्यात आले. त्याची एक वीटही अद्याप रचलेली नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक अद्याप पूर्ण झाले नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नायक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली होती. त्याचाही अद्याप पत्ता नाही. मराठी भवन बांधण्याचे जाहीर केले होते. ते अद्याप बांधले नाही, अशी टीकादेखील राजहंस यांनी केली आहे.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com