विद्याभवनमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

विद्याभवनमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

Published on

विद्याभवनमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
कवी सतीश सोळांकुरकर यांचे मार्गदर्शन; ग्रंथदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत
नेरुळ, ता. २८ (बातमीदार) : पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी कवी व लेखक सतीश सोळांकुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मराठी भाषेचा महिमा सांगत आपल्या कवितांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. वेळेचे महत्त्व, मोठी स्वप्ने पाहण्याची गरज, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच आई-वडील व शिक्षकांचा आदर करण्याचा संदेश त्यांनी दिला. विज्ञान आणि काव्य यांची सांगड घालत त्यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ग्रंथदिंडी काढण्यात आली असून संतांची वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समन्वयक पांडुरंग मुळीक यांनी ज्ञानपीठ पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमास कुलसचिव दिनेश मिसाळ, मुख्याध्यापिका श्रीजा नायर, मुख्याध्यापक गोरख कदम, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शैलेजा मुळे यांनी केले.
चौकट
वाचनसंस्कृतीचा संदेश
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वाचनाची सवय जोपासणे आणि संस्कारांमधून भाषेचे जतन करणे आवश्यक असल्याचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com