आजपासून बेस्ट बस मार्गांमध्ये फेरबदल

आजपासून बेस्ट बस मार्गांमध्ये फेरबदल

Published on

आजपासून बेस्ट बसमार्गांमध्ये फेरबदल
काही ठिकाणी एसी सेवा सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टकडून बससेवेत मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गरजा आणि बदलत्या प्रवासी संख्येचा विचार करून १ मार्चपासून काही मार्गांमध्ये फेरबदल, फेऱ्यांचे पुनर्रचना आणि निवडक मार्गांवर वातानुकूलित (एसी) बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने कमी प्रवासी असलेल्या थांब्यांवरील सेवा कमी करून गर्दीच्या मार्गांवर बसफेऱ्या वाढवण्यावर भर दिला आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगरांतील अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवास अधिक जलद आणि कार्यक्षम करण्याचा दावा केला आहे.
........
मार्गांमध्ये झालेले प्रमुख बदल
ए ६ : बॅकबे आगाराऐवजी आता कुलाबा आगारापर्यंत धावेल.
ए २२ : विजय वल्लभ चौकऐवजी जिजामाता उद्यान ते मजास आगारादरम्यान सेवा
मार्ग ६९ : वडाळा आगाराऐवजी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथे समाप्त
ए ५१५ : सिप्झ गावाऐवजी सिप्झ बस स्थानकापर्यंत मर्यादित
.....
ए १ मार्गात मोठा बदल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रुझ डेपोदरम्यान धावणारी ए १ बस आता वांद्रे रिक्लेमेशन आणि वांद्रे पश्चिम बस स्थानकाचा वळसा टाळणार आहे. माहीम कोळीवाडा ते वांद्रे टॉकीजदरम्यान स्वामी विवेकानंद रोडमार्गे थेट धावणार असल्याने प्रवासाचा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.
.......
ए १०१ मार्गाचा विस्तार
सध्या सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणारी ए १०१ बस आता महात्मा फुले मंडईपर्यंत वाढवण्यात आली आहे. परतीचा मार्ग डॉ. डी. एन. रोड आणि हुतात्मा चौकातून असेल. यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.

या मार्गांवर सुरू होणार एसी बससेवा

खालील मार्गांवर वातानुकूलित बस उपलब्ध होणार आहेत.
ए २०३ (आरसी चर्च - कमला नेहरू उद्यान)
ए ३२४ (शास्त्रीनगर - चांदिवली बस स्थानक)
ए ३२६ (अंधेरी स्थानक पश्चिम - मिल्लतनगर)
ए ३४६ (अंधेरी स्थानक पश्चिम - रमेशनगर)
ए ३५४ (अंधेरी स्थानक पश्चिम - वीरा देसाई मार्ग विस्तारित)
ए ३८१ (माहुल गाव - कुलाबा बस स्थानक)
ए ४१२ (माजगाव आगार - मुंब्रा फाटा, ठाणे)
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com