ठाणे शहरात ‘एक गाव, एक होळी’
ठाण्यात ‘एक गाव, एक होळी’चा नारा
५६९ ठिकाणी सार्वजनिक होलिका दहनाची तयारी
ठाणे, ता. २८ : ठाणे शहरात यंदाची होळी पारंपरिक जल्लोषात आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेतून साजरी होणार आहे. कोपरी येथील ‘एक गाव, एक होळी’ ही संकल्पना आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, संपूर्ण शहरात ५६९ सार्वजनिक होळी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या वतीने ‘एक गाव, एक होळी’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. कोळी बांधव आणि भगिनी पारंपरिक वेशभूषेत एकत्र येऊन, कोळी गीतांच्या तालावर हा उत्सव साजरा करतील. कोपरी येथील विठ्ठल मंदिर परिसरात हे होलिका दहन होणार असून, नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे.
कळवा (खारेगाव) येथील ९० फूट रोडवर ‘राष्ट्रवादी शरदचंद्र मोठा होळी उत्सव २०२६’चे आयोजन केले आहे. येथे नृत्य, संगीत आणि डीजेच्या तालावर तरुणाईचा मोठा सहभाग पाहायला मिळेल. जिद्द शाळेतील विशेष मुलांसोबत २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होळी साजरी करून प्रेम आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर हिरानंदानी मेडोज, माजिवडा, कासारवडवली आणि उपवन भागातही मोठ्या प्रमाणावर खाजगी व सार्वजनिक होळी उत्सवांची लगबग सुरू आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महापालिका सज्ज झाली आहे. ५६९ ठिकाणी सार्वजनिक दहन, तर २,१०७ खासगी होळी दहनांना परवानगी देण्यात आली आहे. शहरात धुलीवंदनाचे ३ आणि मिरवणुकांचे ४ प्रमुख कार्यक्रम नियोजित आहेत. परिमंडळ १ ते ५ मध्ये पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात असेल. नागरिकांनी शांतता राखून आणि नियमांचे पालन करून सण साजरा करावा. हुल्लडबाजी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे पोलिस प्रशासनाने केले आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे महापालिका सज्ज झाले आहेत. २ मार्च २०२६ रोजी होळी व धुलिवंदन निमित्त आयुक्तालय हद्दीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिमंडळ १ ते ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होणार असून धुलिवंदनाचे ३ आणि मिरवणुकांचे ४ कार्यक्रम नियोजित आहेत. नागरिकांनी शांतता, सुरक्षितता आणि नियमांचे पालन करून सण साजरा करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

