पालघर आगारातून एकविरा देवी दर्शनासाठी विशेष बस सुरू
पालघर आगारातून एकविरा देवी दर्शनासाठी विशेष बस सुरू
पालघर, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागातर्फे भाविकांसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येत आहे. रविवारी (ता. १) दररोज सकाळी ५.३० वाजता पालघर आगारातून सुटणारी ही बस ठाणे, पनवेल, खोपोली, लोणावळा मार्गे कार्ला गड येथे जाऊन त्याच मार्गाने पालघरला परत येणार आहे. या विशेष सेवेचा लाभ घेत भाविकांना आता सुरक्षित व सुलभ प्रवास करता येणार आहे.
एकविरा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक सुजित घोरपडे, स्थानक प्रमुख भरत वाघमोडे आणि वाहतूक नियंत्रक अजय संखे यांनी दिली. या प्रवासासाठी प्रौढ प्रवाशांचे तिकीट ६७४ रुपये, तर मुलांसाठी अर्धे तिकीट ३३७ रुपये आकारले जाणार आहे. पालघर व परिसरातील भाविकांनी खासगी वाहनांचा पर्याय टाळून एसटीच्या सुरक्षित सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच बससेवेबाबत अधिक माहितीसाठी स्थानक प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहनही एसटी महामंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

