सिन्नरच्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा
सिन्नरच्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा
- महानिर्मिती-एनटीपीसीने अधिग्रहणाचे ३८०० कोटी रुपये भरले
- १३५० मेगावॉटची क्षमता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर थर्मल पाॅवर लिमिटेडच्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या वीज प्रकल्पाच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव महानिर्मिती आणि एनटीपीसीने एनसीएलटीकडे दिला होता. त्यानुसार ३,८०० कोटी रुपये दोन्ही कंपन्यांनी एनसीएलटीकडे जमा केले आहेत. त्यामुळे १,३५० मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पातून आता वीजनिर्मिती सुरू होणार असून, ती महावितरणला पुरवली जाणार आहे.
सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडच्या अधिग्रहणाची प्रक्रिया २४ फेब्रुवारीमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महानिर्मिती-एनटीपीसी यांच्या संयुक्त ५०-५० टक्के एवढ्या भागीदारीने हे अधिग्रहण झाले आहे. एनसीएलटीने मंजूर केलेल्या अधिग्रहण आराखड्यानुसार एनटीपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग व महानिर्मितीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रक्कम जमा करण्यात आली असल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमप्रसंगी महानिर्मितीकडून संचालक (प्रकल्प) अभय हरणे, संचालक मनेष वाघीरकर, मुख्य अभियंता (प्रकल्प व नियोजन) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल सोनजे, एनटीपीसीकडून संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
महानिर्मितीची क्षमता वाढणार
या अधिग्रहणामुळे महानिर्मितीची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता १०,२०० मेगावॉटवरून ११,५५० मेगावॉटपर्यंत वाढणार आहे. परिणामी, औष्णिक, वायू, सौर व जलविद्युत प्रकल्पांचा समावेश करून महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १५ हाजर मेगावाॅटच्या पुढे पोहोचणार असून, त्यामुळे महाराष्ट्र राज्याची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प महानिर्मितीकडून दोन टप्प्यांत कार्यन्वित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

