‘का रुसली रखुमाई ?’

‘का रुसली रखुमाई ?’

Published on

का रुसली रखुमाई?
भक्ती, प्रेम आणि कर्तव्याचा हृदयस्पर्शी संगम

मुंबई, ता. २८ ः पंढरपूरच्या चंद्रभागा नदीकाठी जिथे भक्तीचा अखंड प्रवाह वाहतो, तिथेच एक प्रश्न मनाला भिडतो- ‘देवत्व जर कायम प्रार्थनांच्या गर्दीत हरवले, तर त्या दैवी प्रेमाचं काय?’ या भावस्पर्शी प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवत मराठी रंगभूमीवरील आगळावेगळा संगीतप्रधान प्रयोग ‘का रुसली रखुमाई?’ रविवारी (ता. १) सायंकाळी ८.३० वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे रंगणार आहे. ‘रिसर्च आयू’ हे या कार्यक्रमाचे हेल्थ पार्टनर आहेत.
या नाटकाची विशेष बाब म्हणजे, एकाच महिला कलाकाराने संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत एकनाथ, संत कान्होपात्रा यांसारख्या संतांच्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत. वेगवान कथानक, नेत्रदीपक प्रकाशयोजना, वेशभूषेतील बदल आणि थेट गायन यामुळे हा प्रयोग आधुनिक आणि तरीही आध्यात्मिक अनुभव देणारा ठरतो.
नाटकातील संगीत हा या प्रयोगाचा आत्मा आहे. संतांच्या अभंग, भारूड आणि ओव्यांवर आधारित मूळ शब्दांना नव्या चाली देऊन सादर करण्यात आले आहे. त्यामुळे परंपरेची गोडी जपत आधुनिक संगीतसाजात रंगलेला हा प्रयोग प्रेक्षकांना भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास घडवतो.
‘का रुसली रखुमाई?’ हे नाटक केवळ मनोरंजन नाही, तर प्रेम, नातेसंबंध आणि निःस्वार्थ सेवेमधील संतुलनाचा संदेश देणारा एक सांस्कृतिक अनुभव आहे. आजच्या वेगवान जीवनशैलीत आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मुळांशी पुन्हा जोडणारा हा प्रयोग नव्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरेल.

दिनांक : रविवार, १ मार्च
वेळ : सायंकाळी ८.३० वा.
स्थळ : यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
प्रवेशिकांसाठी संपर्क : ८०९७६०८०९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com