उत्पन्न वाढीसाठी खटपट

उत्पन्न वाढीसाठी खटपट

Published on

उत्पन्नवाढीसाठी खटपट
उपमहापौरांचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव
भाईंदर, ता. १ (बातमीदार)ः आर्थिक संकटात सापडलेल्या मिरा-भाईंदर पलिकेसमोर उत्पन्नवाढीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी महापालिका रोखे (बॉण्डस) जारी करावेत, असा प्रस्ताव उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आयुक्तांना दिला आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिति अत्यंत नाजुक बनली आहे. विकासकामांची देयके देताना पालिकेच्या नाकीनऊ येत आहे, तर शहारातील कॉँक्रीट रस्त्यांची कामे केवळ निधीअभावी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे उत्पन्नवाढीवर प्रशासनाला विशेष भर द्यावा लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नव्या आर्थिक वर्षात कर आकारणी होणाऱ्या मालमत्तांच्या कर आकरणीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही वाढ तुटपुंजी ठरणार असल्याने उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी पालिकेने स्वत:चे रोखे जारी करावेत, असा प्रस्ताव आयुक्त राधाबीनोंद शर्मा यांना दिला आहे. त्यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात भांडवली निधी उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.
---------------------------------
बॉण्ड खरेदीचा पर्याय
महापालिकेची आर्थिक पत पाहून बँकादेखील कर्ज देण्यावरून संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे पालिकेची स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी रोखे जारी करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पालिकेला कर्जासाठी द्याव्या लागणाऱ्या व्याजापेक्षाही कमी व्याज रोखे घेणाऱ्यांना द्यावे लागेल. त्यामुळे पालिकेचे उत्पन्नही वाढेल. तसेच व्याजापोटी होणाऱ्या खर्चातही बचत होईल, असा प्रस्ताव मांडला आहे.
-----------------------
महापालिकेने रोखे जारी केल्यास सुमारे दोनशे कोटींचा निधी उभा रहाण्याचा अंदाज आहे. त्यातून रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजना, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधाना गती मिळेल. शिवाय महापालिकेची आर्थिक विश्वासाहर्ता अधिक दृढ होईल.
-ध्रुवकिशोर पाटील, उपमहापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com