प्रत्येक तालुक्यात जनता दरबार
प्रत्येक तालुक्यात जनता दरबार
खासदार डॉ.हेमंत सवरा यांची घोषणा
कासा, ता.१(बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण व्हावे, यासाठी डहाणू, तलासरी तालुक्यात
शुक्रवारी खासदार हेमंत सावरा यांनी जनता दरबार घेतला. यावेळी प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले,
पालघर जिल्हास्तरावर पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला होता. त्या वेळी पाचशेहून अधिक तक्रारी आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर तालुकास्तरावरच जनता दरबार घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, प्रांताधिकारी विशाल खत्री, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, मुख्याधिकारी अक्षय गुडधे, बांधकाम विभागाचे उपअभियंता पगारे, गटशिक्षणाधिकारी संजय वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील बहुतांश तक्रारी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांशी समनव्य साधत ७५ ते ८० टक्के तक्रारी तालुकास्तरावरच निकाली निघू शकतात. त्यामुळे तालुकास्तरावर जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

