कल्याण-डोंबिवलीकर पॉवर लिफ्टर्सचा दिल्लीत डंका

कल्याण-डोंबिवलीकर पॉवर लिफ्टर्सचा दिल्लीत डंका

Published on

कल्याण-डोंबिवलीकर पॉवरलिफ्टर्सचा दिल्लीत डंका
आशिया चॅम्पियनशिपमध्ये ५५ सुवर्णपदकांची लयलूट
डोंबिवली, ता. १ : दिल्लीतील शहा ऑडिटोरियम येथे पार पडलेल्या डब्ल्यूआरपीएफ आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र आणि विशेषतः कल्याण-डोंबिवलीच्या खेळाडूंनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. आशिया खंडातील पाच देशांतील २५२ स्पर्धकांमध्ये महाराष्ट्राच्या ३१ खेळाडूंनी तब्बल ५५ सुवर्णपदके पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

केवळ सुवर्णच नव्हे, तर इतर पदकांमध्येही खेळाडूंनी छाप पाडली. अनिकेत अडसूळ याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य, तर वैभव मोहिते याने दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदके पटकावली. आदेश बनकर आणि सिद्धार्थ सरवडे यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके मिळवली. सुजित जाधव याने दोन रौप्य आणि एक सुवर्ण, दीपा देढिया हिने एक रौप्य आणि एक सुवर्ण, तर योगेश जांभूळकर याने दोन कांस्य व एका सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय राजेश्वर धोत्रे, जीवन मसूद, नीरज यादव आणि कैलास मुनीर यांनीही सुवर्णपदके जिंकून पदकतालिकेत भर घातली. महाराष्ट्राच्या ३१ स्पर्धकांपैकी ३० पॉवरलिफ्टर्स हे कल्याण-डोंबिवली परिसरातील आहेत. महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून सौरभ चौधरी तर प्रशिक्षक म्हणून समीर जोगळेकर यांनी जबाबदारी सांभाळली.

खेळाडूंसाठी सुसज्ज व्यवस्थेचे आश्वासन
विजेत्या खेळाडूंचे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयात स्वागत केले. या वेळी बोलताना त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि कल्याण-डोंबिवली परिसरात पॉवरलिफ्टिंगच्या प्रशिक्षणासाठी सुसज्ज व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com