खाकी वर्दीतून सामाजिक बांधिलकी
खाकी वर्दीची सामाजिक बांधिलकी
पोलिस उपायुक्तांच्या सहभागाने कल्याण-डोंबिवलीत स्वच्छता अभियान
कल्याण, ता. १ (बातमीदार): स्वच्छता हीच सेवा हा मंत्र जपत कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात नुकतेच भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या मोहिमेत पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रत्यक्ष झाडू हातात घेऊन श्रमदान केल्याने ही मोहीम नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.
नेहमी गुन्हेगारी नियंत्रण आणि बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या पोलिस प्रशासनाने या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केवळ औपचारिकता न पाळता स्वतः प्रत्यक्ष स्वच्छतेत सहभाग नोंदवला. त्यांच्यासोबत पोलिस दलातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी एक विशेष संकल्पना मांडली. ते म्हणाले, की जेव्हा एखादे शहर स्वच्छ असते तेव्हा तेथील नागरिकांची वृत्ती सकारात्मक राहते. हीच सकारात्मकता शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी अत्यंत पूरक ठरते.
प्रतिष्ठानचा शिस्तबद्ध सहभाग
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देशपातळीवर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा भाग म्हणून हे अभियान आयोजित करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या शेकडो श्री सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कल्याण-डोंबिवलीतील विविध परिसर चकाचक केले. पोलिस दलाने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि खाकी वर्दीतील संवेदनशील रूप पाहून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. इतर शासकीय विभागांसाठीही हे अभियान प्रेरणादायी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

