लोकलवरील ताण कमी करण्यासाठी डोंबिवली–ठाणे बससेवा

लोकलवरील ताण कमी करण्यासाठी डोंबिवली–ठाणे बससेवा

Published on

लोकलमधील गर्दीला बसचा पर्याय
डोंबिवली-ठाणे बससेवा ४ मार्चपासून सुरू
डोंबिवली, ता. १ : डोंबिवली ते ठाणे यादरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडीएमसी आणि ठाणे महापालिकेच्या टीएमसीने संयुक्तपणे नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मार्चपासून ही सेवा प्रवाशांच्या भेटीला येणार असली, तरी बस थांब्याच्या अंतरावरून प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

बुधवारी (ता. ४) डोंबिवली-ठाणे बससेवा सुरू होईल. सुरुवातीला दोन ४० आसनी बस उपलब्ध असतील. ‘पीक अव्हर’मध्ये सकाळी आणि संध्याकाळी मिळून एकूण आठ फेऱ्यांचे नियोजन आहे. ही बस डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथून सुटून मानकोली पूलमार्गे घोडबंदर रोड आणि माजिवडा चौकापर्यंत धावणार आहे. नुकताच बारावीच्या परीक्षेला जाताना मुंब्रा-कळवा यादरम्यान लोकलमधून पडून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रेल्वेतील ही जीवघेणी गर्दी लक्षात घेता, रस्ते वाहतुकीचा सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत होती.

प्रवाशांसमोरील आव्हाने
प्रशासनाने बस सुरू केली असली, तरी प्रवाशांच्या मनात काही तांत्रिक अडचणींबाबत प्रश्नचिन्ह आहे.
रेल्वे स्थानकापासून अंतर : प्रस्तावित बस थांबा (मोठागाव) हा रेल्वे स्थानकापासून १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील प्रवाशांना बस पकडण्यासाठी पुन्हा रिक्षाचा प्रवास करावा लागेल.
फाटकाचा अडथळा : मोठागाव परिसरात जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडावे लागते. फाटक बंद असल्यास बस गाठणे जिकिरीचे ठरू शकते.
मर्यादित लाभ : ही सेवा प्रामुख्याने स्वामी नारायण सिटी आणि मोठागाव भागातील रहिवाशांसाठी सोयीची आहे. मात्र, डोंबिवली पूर्व किंवा मानपाडा भागातील लोकांसाठी ही सेवा ‘लांबची’ ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com