ग्रहणातच चंद्राचा उदय

ग्रहणातच चंद्राचा उदय

Published on

महाराष्ट्रात दिसणार काळसर-लालसर चंद्र
मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण
ठाणे, ता. १ (बातमीदार) : येत्या मंगळवारी, ३ मार्च २०२६ला खगोलप्रेमींसाठी एक दुर्मिळ संधी चालून आली आहे. या दिवशी होणारे चंद्रग्रहण महाराष्ट्रातील नागरिकांना एका विशेष स्थितीत पाहायला मिळणार आहे. खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, या दिवशी चंद्र ग्रहण अवस्थेतच उगवताना दिसणार असून, हे दृश्य साध्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
ग्रहणाची सुरुवात दुपारी ३:२० वाजता होईल. (या वेळी चंद्र क्षितिजाखाली असल्याने दिसणार नाही). चंद्रोदय सायंकाळी विविध शहरांत वेगवेगळ्या वेळी होईल, तर ग्रहण समाप्ती सायंकाळी ६:४८ वाजता असेल. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत येतो तेव्हा तो पूर्णपणे काळा न दिसता काळसर-लालसर रंगाचा दिसतो. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी मिळणार आहे. हे केवळ एक नैसर्गिक खगोलीय दृश्य असून, मनात कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांमधील वैज्ञानिक कुतूहल जागृत करण्यासाठी त्यांना हे दृश्य नक्की दाखवावे, असे आवाहन दा. कृ. सोमण यांनी केले आहे.

प्रमुख शहरांतील चंद्रोदय आणि ग्रहणाचा कालावधी
शहर चंद्रोदयाची वेळ ग्रहण सुटण्याची वेळ दिसण्याचा कालावधी
नागपूर सायं. ६:१८ सायं. ६:४८ ३० मिनिटे
सोलापूर सायं. ६:३३ सायं. ६:४८ १५ मिनिटे
छ. संभाजी नगर सायं. ६:३४ सायं. ६:४८ १४ मिनिटे
नाशिक सायं. ६:४० सायं. ६:४८ ८ मिनिटे
कोल्हापूर सायं. ६:४० सायं. ६:४८ ८ मिनिटे
पुणे सायं. ६:४१ सायं. ६:४८ ७ मिनिटे
रत्नागिरी सायं. ६:४४ सायं. ६:४८ ४ मिनिटे
मुंबई सायं. ६:४५ सायं. ६:४८ ३ मिनिटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com