स्वच्छतेतून सेवेचा कानमंत्र

स्वच्छतेतून सेवेचा कानमंत्र

Published on

स्वच्छतेतून सेवेचा कानमंत्र
विरारमध्ये श्रीसदस्यांचे स्वच्छता अभियान
विरार, ता.१ (बातमीदार)ः पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा)च्यावतीने विरार शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी हजारो श्रीसदस्यांनी स्वच्छतेतून सेवेचा कानमंत्र दिला.
विरार-मनवेलपाडा परिसरात रविवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच प्रतिष्ठानचे स्वयंसेवक हातात झाडू आणि कचरा संकलनाचे साहित्य घेऊन दाखल झाले होते. या अभियानांतर्गत मनवेलपाडा परिसर, मुख्य बाजारपेठ, हिल पार्क परिसर आणि मुख्य रस्त्यांची कसून साफसफाई करण्यात आली. साचलेला कचरा आणि प्लास्टिकचे ढीग उचलून श्री-सदस्यांनी परिसराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त करून दिले. या मोहिमेत वसई-विरारचे महापौर अजीव पाटील, नगरसेवक प्रशांत राऊत, नगरसेविका संगीता भेरे यांच्यासह महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आज जगासमोर कचऱ्याची मोठी समस्या आहे. प्रत्येक नागरिक कचरा करतो, पण साफसफाई करणारा प्रत्येक कर्मचारी हा खरा स्वच्छतादूत आहे. अशा उपक्रमांतूनच प्रत्येक नागरिकाने स्वच्छतादूत कसे व्हावे, याची प्रेरणा मिळत असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com