श्वानदंशामुळे पालकांची पायपीट
कासा, ता. १ (बातमीदार)ः तालुक्यातील चिखले गावातील ईशांत पाटीलला पिसाळलेला कुत्रा चावला होता. या घटनेनंतर ईशांतला तातडीने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्याने पालकांना धावपळ करावी लागली.
पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवा व्यवस्थेची दयनीय अवस्था झालेली आहे. उपचारांसाठी नागरिकांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात, तर कधी जिल्ह्याबाहेर, सीमेपलीकडे धाव घ्यावी लागत आहे. असाच काहीसा प्रकार चिखले गावातील ईशांत पाटीलच्या कुटुंबीयांना आला. डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशावरील लस नसल्याने ईशांतच्या पालकांना धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल किंवा केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला गेला. अखेर तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात लस मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला, पण या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य व्यवस्थेतील त्रृटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.
--------------------------
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एआरव्ही, एएसयूचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता नाही.
- डॉ. ऋग्वेद दुधाट, आरोग्य अधिकारी, डहाणू
-------------------------
पालघर जिल्ह्यात श्वान, सर्पदंशाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे नेहमीच खबरदारी घेत असतो. बहुतेक सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध असते, पण उपजिल्हा रुग्णालयात नसल्याची माहिती घेतली जाईल.
- डॉ. रामदास मराड, सिव्हिल सर्जन, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

