जव्हारमध्ये स्वच्छता अभियान
जव्हारमध्ये स्वच्छता अभियान
जव्हार, ता.१ (बातमीदार)ः डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रविवारी जव्हार शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत ३५२ श्रीसदस्यांनी शहरातील प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी उपस्थित राहून श्रमदानात सहभाग घेतला. माजी नगर परिषद सभापती गणेश रजपूत यांनीही सहकार्य केले. विजयस्तंभ परिसर, तहसील व पंचायत समिती कार्यालय,सरकारी रुग्णालय, राजीव गांधी स्टेडियम, एस.टी.स्थानक, पोलिस ठाणे, सूर्यातलाव, हनुमान पॉईंट, मंदिरे, बँका व सार्वजनिक वाचनालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत २ ट्रॅक्टर, ६ कचरा गाड्या तसेच झाडू, फावडी व इतर साहित्याचा वापर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

