पालघरमध्ये महास्वच्छता अभियान

पालघरमध्ये महास्वच्छता अभियान

Published on

पालघरमध्ये महास्वच्छता अभियान
३६ टन कचऱ्याचे संकलन, सातशेपेक्षा अधिक श्रीसदस्य सहभागी
पालघर, ता.१ ः जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर तसेच गुजरात राज्यातील उंबरगाव आणि सेलवासा येथील विविध परिसरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सातशेपेक्षा अधिक श्री सदस्यांनी सहभाग नोंदववला.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. गल्ली-बोळांमधील सुका, ओला कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करून खासगी वाहनांच्या साहाय्याने कचराभूमीवर पाठवण्यात आला. हातमोजे, झाडू, मास्क, साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात आले होते. समर्पणाच्या विचारातून श्रीसदस्य स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. या अभियानामध्ये जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, आमदार राजेंद्र गावित, नगराध्यक्ष उत्तम घरत, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, संजय चौधरी तसेच सभापती ,नगरसेवक आदीनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com