स्थानक परिसरात मोबाईल चोरींचा सुळसुळाट

स्थानक परिसरात मोबाईल चोरींचा सुळसुळाट

Published on

ठाणे स्थानकात मोबाईल चोरांचा सुळसुळाट
४८ तासांत नऊ गुन्हे; १० मोबाईल लंपास, पावणे तीन लाखांचा ऐवज चोरीला
ठाणे, ता. १ : रेल्वे स्थानक आणि उपनगरी लोकल प्रवासादरम्यान मोबाईल चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या अवघ्या ४८ तासांत स्थानक परिसर आणि धावत्या लोकलमध्ये मोबाईल चोरीच्या तब्बल नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी अंदाजे दोन लाख ७२ हजार रुपये किमतीचे १० महागडे मोबाईल फोन लंपास केले आहेत. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ आणि २८ फेब्रुवारीदरम्यान या चोरीच्या घटना घडल्या. बहुतांश चोऱ्या या गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना झाल्या आहेत. काही प्रवाशांचा गाफीलपणा किंवा झोपेचा फायदा घेऊनही चोरट्यांनी हात साफ केला आहे.

संदेशकुमार पाथरे यांचा डोंबिवली लोकलमध्ये चढताना त्यांचे ४१,९९९ रुपयांचे दोन मोबाईल चोरीला गेले. शिक्षिका पुनम सिंग या ठाणे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांचा २४ हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेल्याचे उघड झाले. वकील विशाल बोबडे यांचा गर्दीच्या वेळी त्यांचाही मोबाईल लंपास करण्यात आला. त्याचबरोबर चमनकुमार प्रसाद, पुंडलीक जाधव, राजकुमार अग्रहरी, विकीकुमार शहा, अंबिका गौरव आणि अमित यादव यांचेही मोबाईल ऐरोली, दिवा, मुंब्रा आणि ठाणे दरम्यान प्रवास करताना चोरीला गेले. या नऊ घटनांमध्ये चोरीला गेलेल्या एकूण १० मोबाईलची किंमत २,७१,९९८ रुपये इतकी आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com