सुट्टीतही करसेवा सुरू
वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून शहरात कर वसुलीची विशेष मोहीम राबवली जात आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ एक महिना शिल्लक असल्याने नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने सुटीच्या दिवशीही करसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेचे मुख्य कार्यालय, तसेच शहरातील आठ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार तसेच गुढीपाडवा, श्रीराम नवमी आणि महावीर जयंती या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी १० ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. नवी मुंबईतील मालमत्ताधारकांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात कर भरण्याबरोबरच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर विभागाकडून थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली असून, थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेकडून विविध माध्यमांतून नागरिकांना वेळेत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन कर भरण्याची ही सुविधा ३१ मार्चपर्यंत उपलब्ध असणार आहे. शहराच्या विकासासाठी करदात्यांनी वेळेत कर भरावा व थकबाकीमुळे होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

