कल्याणमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली

कल्याणमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली

Published on

कल्याणमध्ये ‘मराठी भाषा गौरवदिनी’ ग्रंथदिंडी
न्यू हायस्कूलतर्फे भव्य जनजागृती रॅली
डोंबिवली, ता. १ : जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जोशीबाग यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कल्याण शहरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात काढण्यात आलेल्या भव्य जनजागृती रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक गो. ना. अक्षीकर यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून झाली. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथालयातील विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक नगरसेविका मेघाली सचिन खेमा, ज्येष्ठ संचालक आर. डी. पाठक, अशोक साळी आणि प्राचार्य सतीश सोपान घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.

पारंपरिक वेशभूषा
संस्थेचे कार्यवाह विकास पाटील व वैशाली पाटील यांच्या हस्ते ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’चे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती आणि संत-साहित्यिकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी यांचा सहभाग होता. लेझीम पथक, बँड पथक आणि पालखी-रथाचा सहभाग होता. जोशीबाग संकुलातून निघालेली ही रॅली रामबाग, काळा तलाव, चिखले बाग आणि मल्हार नगर मार्गे पुन्हा विद्यालयात परतली.

मराठी संस्कृतीचा जयघोष
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोवाडे, मराठी कविता आणि गाणी सादर करून मराठी भाषा व संस्कृती जपण्याचा संदेश दिला. नगरसेविका अस्मिता अरविंद मोरे यांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे कौतुक केले व अल्पोपहाराची व्यवस्था केली. या सोहळ्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी आणि कल्याणकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com