ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यांत वाढ; १० गुन्हे अद्याप अनुत्तरित, तपासावर प्रश्नचिन्ह
ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यांत वाढ
१० गुन्हे अद्याप अनुत्तरित; तपासावर प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : मागील काही दिवसांत शहरात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिस दलाचे खंडणीविरोधी पथक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या दोन वर्षांत खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत पोलिसांच्या कामगिरीवर समाधानासोबतच काही प्रश्नही उपस्थित होत आहेत.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीत खंडणीचे एकूण १६० गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी यातील १५० गुन्हे उघडकीस आणले असले, तरी १० गुन्हे अजूनही प्रलंबित आहेत. धक्कादायक बाब म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यांचे प्रमाण २०२४च्या तुलनेत २०२५मध्ये वाढले आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये १०० टक्के उकल अपेक्षित असताना उर्वरित गुन्हे प्रलंबित राहणे ही चिंतेची बाब नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास गतीने करून आरोपींना लवकर अटक केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खंडणीविरोधी पथकाकडून विशेष मोहीम
विशेष म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून धमक्या, आर्थिक व्यवहारांचे डिजिटल स्वरूप आणि आंतरजिल्हा टोळ्यांचा सहभाग असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा होत आहे. काही प्रकरणांत आरोपी परराज्यात किंवा परदेशात असल्याने तपासाला विलंब होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून या सर्व प्रलंबित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात असून, तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. खंडणीविरोधी पथकाकडून विशेष मोहीम राबविण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
खंडणी कारवाई तक्ता
सन दाखल गुन्हे उघड गुन्हे टक्केवारी
२०२५ ८५ ८२ ९६%
२०२४ ७५ ६८ ९१%
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

