साखरेच्या गाठींनी वाढला खरेदीचा गोडवा

साखरेच्या गाठींनी वाढला खरेदीचा गोडवा

Published on

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : होळी सण जवळ आल्याने नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, तुर्भे, घणसोली आणि ऐरोली येथील बाजारपेठांमध्ये सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. साखरेच्या गाठी (बत्ताशे माळा) खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पारंपरिक होळी पूजेसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या साखरेच्या गाठींना यंदा विशेष मागणी दिसून येत आहे.

विक्रेत्यांच्या माहितीनुसार, यंदा साध्या गाठींसोबतच रंगीत व सजावटीच्या माळांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साखरेच्या दरात किंचित वाढ झाल्यामुळे गाठींच्या किमतीत थोडी वाढ झाली असली तरी सणामुळे खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. होळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बाजारपेठा सणाच्या वस्तूंनी सजल्या असून पिचकाऱ्या, रंग, पुरणपोळी आणि पूजासाहित्य विक्रीलाही वेग आला आहे. साखरेच्या गाठींच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक किरकोळ व्यापारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. होळीच्या आगमनाने नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये सणाची गोडी आणि उत्साह दोन्ही वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

होलिका पूजासामग्रीसाठी गर्दी
होलिका दहनासाठी पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारात दाखल होत आहे. साखरेच्या गाठी, नारळ, हार-फुले आणि रंगीत पूजा सामग्रीची विक्री वाढली आहे. विशेषतः आगरी-कोळी व पारंपरिक कुटुंबांमध्ये होळी पूजेसाठी साखरेच्या गाठी अर्पण करण्याची प्रथा आजही कायम असल्याने विक्रीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com