सणासुदीला पाणीटंचाईशी सामना
मनोर, ता.१(बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या शंभर एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवर गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम लांबल्याने पालघरच्या पूर्व भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सणासुदीलाच गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
वसई तालुक्यातील कोपर गावाच्या हद्दीत रविवारी (ता.२२) गळती सुरु झाली होती. आठवडाभरापूर्वी वसई तालुक्यातील कोपर गावाच्या हद्दीत वसई विरार पालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनीला गळती सुरु झाली होती. गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरु करण्यासाठी पालघर तालुक्यातील येथील मासवण स्थित सूर्या नदीवरील पंपिंग स्टेशनवरील विद्युत पंप बंद करण्यात आले. पण मुंबई अहमदाबाद महामार्गालगत खाजण भागात झालेला माती भराव, खाऱ्या पाण्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होत असल्यामुळे दुरुस्तीचे काम लांबले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. जलवाहिनी मधून मिळणारे पाणी बंद झाल्याने दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवताना महिलांसह ग्रामस्थांची दमछाक होत आहे.
------------------------
चाळीस फुटापर्यंत खोदकाम
वसई-विरार पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी कोपर गावाच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गालगत फुटल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. महामार्गालग माती भराव झाल्याने जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी तीस ते चाळीस फुटापर्यंत खोदकाम करावे लागले. गळती लागलेल्या ठिकाणी खाजण भाग असल्यामुळे जलवाहिनीवरील खाऱ्या पाण्याचा प्रभावामुळे जलवाहिनी गंजली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

