करिअर कट्टा उपक्रमात द. ग. तटकरे महाविद्यालयाचा यशस्वी झेंडा

करिअर कट्टा उपक्रमात द. ग. तटकरे महाविद्यालयाचा यशस्वी झेंडा

Published on

करिअर कट्टा उपक्रमात द. ग. तटकरे महाविद्यालयाचा यशस्वी झेंडा
राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम; अनेक मानाचे पुरस्कार पटकावले
माणगाव, ता. ३ (वार्ताहर) : द. ग. तटकरे महाविद्यालय यांनी करिअर कट्टा या राज्यस्तरीय उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाविद्यालयाला उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय प्रथम क्रमांक, उत्कृष्ट जिल्हास्तरीय संसद प्रथम पुरस्कार तसेच सोलार एनर्जी अवेअरनेस प्रशिक्षण अभियानात द्वितीय क्रमांक मिळाला. मुंबई विभागीय सहसमन्वयक डॉ. बबन सिनगारे यांना उत्कृष्ट सहसमन्वयक म्हणून विशेष सन्मान देण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत, रवींद्र साठे व यशवंत शितोळे यांच्या उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. राजेंद्र आचार्य व डॉ. नमिता मोरे यांनी पुरस्कार स्वीकारले.


नेतृत्व व करिअर मार्गदर्शनाचा संगम
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, करिअर नियोजन व सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी करिअर कट्टा उपक्रम प्रभावी ठरला असून महाविद्यालयाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे माणगाव तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com