बाल वैज्ञानिकांच्या कल्पकतेने प्रेक्षक थक्क

बाल वैज्ञानिकांच्या कल्पकतेने प्रेक्षक थक्क

Published on

बाल वैज्ञानिकांच्या कल्पकतेने प्रेक्षक थक्क
एम. बी. मोरे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन
रोहा, ता. १ (बातमीदार) : धाटाव येथील एम. बी. मोरे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेल्समधून वैज्ञानिक दृष्टिकोन व कल्पकतेचे उत्कृष्ट दर्शन घडले.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन सुदर्शन कंपनीचे आय.आर. मॅनेजर संतोष मोंढावे व प्रॉडक्शन मॅनेजर सुधीर पिसाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मुख्याध्यापिका तेजल सावंत व शिक्षकवृंद उपस्थित होते. सौरऊर्जेवर चालणारी कार, पवनचक्कीद्वारे वीजनिर्मिती, जलशुद्धीकरण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, हायड्रोलिक ब्रिज, स्मार्ट इरिगेशन प्रणाली, सेन्सरवर आधारित सुरक्षा यंत्रणा तसेच मानवी शरीररचनेची जिवंत मॉडेल्स विशेष आकर्षण ठरली.
प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना मुलांनी सोप्या भाषेत समजावून सांगितल्याने सर्वच भारावून गेले.
चौकट
प्रयोगातून विज्ञानाची गोडी
शालेय स्तरावर असे उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, निरीक्षणशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. विज्ञानाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून पटवून देणारे हे व्यासपीठ भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.

फोटो कॅप्शन : विज्ञान प्रदर्शन प्रसंगी विविध मॉडल सादर करताना एमबी मोरे इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com