कर्जत राज्यमार्गाचे काम रखडलेलेच

कर्जत राज्यमार्गाचे काम रखडलेलेच

Published on

कर्जत राज्यमार्गाचे काम रखडलेलेच
अपघातांच्या पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलनाचा इशारा
कर्जत, ता. १ (बातमीदार) : कर्जत, नेरळ, बदलापूर आणि अंबरनाथ शहरांना जोडणाऱ्या राज्य मार्ग क्र. ७६ या कर्जत-नेरळ-कल्याण मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून झालेली दुरवस्था नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. २०१६ मध्ये पी. पी. खारपाटील या ठेकेदारामार्फत सुरू झालेले काँक्रीटीकरणाचे काम तब्बल १० वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही.
काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट तर काही ठिकाणी डांबरीकरण, अनेक ठिकाणी अर्धवट रस्ता, तर अपूर्ण पुलांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. नेरळ विद्यामंदिर ते माथेरान गेट, शेलू कमान, उमरोली, वडवली, सावरगाव आणि वांजळे परिसरात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, नेरळ पोलिस ठाण्याजवळील पुलाला तडे गेल्याने एक बाजू बंद आहे. याच ठिकाणी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार चंद्रकांत ऐनकर यांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
सात-आठ वर्षांत झालेल्या अपघातांप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, प्रशासनाने तातडीने काम पूर्ण न केल्यास रास्ता रोकोसह मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोट
हा रस्ता संपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरणाचा असताना अर्धा डांबरीकरण व अर्धा काँक्रीट का आहे? अनेक ठिकाणी पुलांची कामे अर्धवट आहेत. १० वर्षांत काम पूर्ण झाले नाही. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास मोठे जनआंदोलन उभारून रास्ता रोको केला जाईल.
- गोरख शेप, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मानवाधिकार, रायगड

चौकट
हालचाली सुरू
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी नेरळ पोलिस ठाण्याजवळील बंद असलेल्या पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. सावरगावसह इतर ठिकाणच्या रस्त्यासाठी वनखात्याचे प्रस्ताव तयार केले जाणार असून, माथेरान गेट ते नेरळ विद्यामंदिर दरम्यान भूसंपादन प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. मात्र, दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला असून, तातडीने ठोस कृती आराखडा जाहीर करून काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com