शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

Published on

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : भिवंडी शहरात तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सवासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. शहरात येत्या ५ व ६ मार्चला शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. उत्सव सुरळीत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून शिवसेना उपनेते रूपेश म्हात्रे, आमदार महेश चौघुले, आमदार रईस शेख व गणेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी दिलीप खाने, किशोर शिंगोळे आणि सुरज ठाकूर यांची नियुक्ती केली. प्रसिद्धीप्रमुख म्हणून शरद भसाळे व लवेश सोमा, सचिव म्हणून राजाभाऊ पुण्यार्थी, सहसचिव गीता चौधरी, प्रशांत पवार व आशा माने यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी नाना वगळ, सहखजिनदारपदी सलाम शेख व कल्पेश केणे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच निधी समिती सभापती म्हणून वैशाली मेस्त्री, मिरवणूक समिती सभापती अरुण पाटील आणि मिरवणूक देखरेख समिती सभापती म्हणून सुनील शिंदे यांची निवड केली आहे. शहरातील शिवप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने यंदाचा शिवजयंती उत्सव भव्य व दिमाखदार स्वरूपात साजरा करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com