गोराई आगारात दोन अजगर आढळल्याने खळबळ

गोराई आगारात दोन अजगर आढळल्याने खळबळ

Published on

गोराई आगारात दोन अजगर आढळल्याने खळबळ
मालाड, ता. १ (बातमीदार) : बोरिवली पश्चिम येथील बेस्टच्या गोराई आगारात आज सकाळी दोन मोठे अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अचानक अजगर दिसताच आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
एका कर्मचाऱ्याच्या नजरेस अचानक अजगर पडताच त्याने तत्काळ इतर सहकाऱ्यांना सतर्क केले. धाडस दाखवत एका कर्मचाऱ्याने पुढाकार घेत पहिला अजगर जेरबंद केला. मात्र, त्याचवेळी त्याच्याजवळ आणखी एक अजगर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोन्ही अजगरांना शिताफीने पकडून गोणीत सुरक्षितरीत्या बंद करण्यात आले. या प्रकारामुळे काही काळ आगार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. पकडण्यात आलेल्या दोन्ही अजगरांना नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे आगार परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com