पार्किंगच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा
भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : भिवंडीतील चाविंद्रा रोड येथील रामनगरमधील मन्सूराबाद परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एका कुटुंबीयांनी शेजारील दाम्पत्यावर हल्ला करत पतीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सूराबाद परिसरातील रहिवासी सफीना मोहम्मद इब्राहिम अन्सारी (३१) यांच्या शेजारी मुबाशिर हुसेन अन्सारी यांनी त्यांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. त्यामुळे घराबाहेर ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. दुचाकी हटवण्यास सांगितल्याचा राग आल्याने मुबाशिर अन्सारी व त्यांच्या कुटुंबीयांनी संतप्त होऊन वाद घातला. त्यानंतर मुबाशिर अन्सारी, अहमद अन्सारी, कैफी अन्सारी, अर्कम खान, साजिदा खातून, सना खान आणि खुशी अन्सारी यांनी संगनमताने सफीना आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच मुबाशिर याने दांडक्याने मारहाण करून सफिनाच्या पतीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही नमूद केले आहे. या मारहाणीत सफीना व तिचा पती दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन कुचेकर करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

