डोंबिवलीत गॅस पाईपलाईनला गळती
डोंबिवलीत गॅस पाइपलाइनला गळती
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : डोंबिवलीत रविवारी (ता. १) दुपारी महानगर गॅसच्या पाइपलाइनला गळती लागल्याने परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गॅसची गळती सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच आगीचा भडका उडाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा भोईरवाडी येथील मॉडेल कॉलेज परिसरात ही घटना घडली. स्थानिक नागरिकांना परिसरात गॅसचा तीव्र वास येत असल्याचे जाणवताच त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणांना याची माहिती दिली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला घटनेबाबत कळविण्यात आले. संबंधित पाइपलाइन ही महानगर गॅस लिमिटेडची असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आणि सुमारे ३ वाजून २ मिनिटांनी तेथे पोहोचले. त्यानंतर लगेचच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या वेगवान आणि समन्वयित कारवाईमुळे सुमारे अर्ध्या तासात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली. दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी परिसर सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

