जुन्या वादातून घरात घुसून तोडफोड
अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : जुन्या वादाचा राग मनात धरून एका महिलेच्या घरात घुसून दहशत माजवत तोडफोड आणि चोरी केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध शुक्रवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या चंदा रामसेवक गुप्ता यांचा शेजारी बिरा मनिवेल व येलुमले राजलिंगम यांच्याशी वाद झाला होता. या वादाची तक्रार करण्यासाठी गुप्ता पोलिस ठाण्यात गेल्या असताना, १४ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० ते १५ फेब्रुवारीच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास बिरा मनिवेल याचे नातेवाईक हरी, रवी, तौला, भरत आणि मंडा (पूर्ण नाव अज्ञात, सर्व रा. स्वामीनगर) यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. हातात लाकडी काठ्या व कोयते घेऊन आलेल्या आरोपींनी घरातील टीव्ही, कुलर, खिडक्यांच्या काचा तसेच सुरक्षेसाठी बसवलेले तीन सीसीटीव्ही फोडून सुमारे १७ हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर कपाटाचे लॉकर उचकटून १० चांदीची नाणी, दिवे, वाट्या, पेझण तसेच सोन्याची नथ व कानातील टॉप्स असा सुमारे ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चंदा गुप्ता यांच्या तक्रारीवरून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनीष वाघमारे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

