शिव मार्केटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा

शिव मार्केटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा

Published on

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : पश्चिमेतील शिव मार्केट परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. बंदिस्त खोलीत सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगारावर टाकलेल्या छाप्यात सहा जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी (ता. २८) सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास शिव मार्केटमधील गल्ली क्रमांक ७ येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान आर्थिक फायद्यासाठी ‘तीन पत्ती’ हा जुगार खेळणारे व खेळवणारे सहा जण आढळून आले. याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखा घटक ४चे पोलिस हवालदार चंद्रकांत सावंत यांनी तक्रार दिली आहे. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप शेवाळे (नाशिक), शकील अहमद शेख (अंबरनाथ पश्चिम), जयवंत शिर्के (अंबरनाथ पूर्व), भरत कोळी (उल्हासनगर-४), रोहित पंजाबी (उल्हासनगर-४) आणि हरीशचंद्र घरत (मुरबाड) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष वाघमारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com