ई-चलन दंड तडजोडीने निकाली निघणार
उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : वाहनांवरील प्रलंबित ई-चलन दंड तडजोडीने त्वरित निकाली काढण्यासाठी लोकअदालतीत विशेष संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने लोकअदालतीत ही सुविधा दिल्याची माहिती विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.
वाहतूक नियमभंगासंदर्भातील ई-चलन दंड प्रलंबित असलेल्या वाहनचालकांनी दंड कमी करून तडजोडीने निकाली काढण्यासाठी विठ्ठलवाडी वाहतूक उपविभाग, उल्हासनगर-४ कार्यालयात उपस्थित राहून संबंधित खटले दाखल करून दंड भरावा, असे आवाहन केले आहे. यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रात कॅम्प क्रमांक ४ व ५; तसेच श्रीमलंग गड परिसराचा समावेश आहे. या भागात नियमांचे उल्लंघन करणारे, कागदपत्रांशिवाय वाहन चालविणारे दुचाकीस्वार व रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दंड कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने वाहनचालक या संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे येत असल्याचेही अनिल पडवळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

