सानपाड्यात १८ लाखांच्या हेरॉईनसह महिला अटकेत

सानपाड्यात १८ लाखांच्या हेरॉईनसह महिला अटकेत

Published on

सानपाड्यात १८ लाखांच्या हेरॉईनसह महिला अटकेत

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सानपाडा पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत सानपाडा रेल्वे स्थानक परिसरातून एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल १८ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे ३७.८५ ग्रॅम हेरॉईन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित महिला हे हेरॉईन कुठून घेऊन आली आणि ते कोणाला विक्री करणार होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

शनिवार (ता. २८) रोजी सायंकाळच्या सुमारास सानपाडा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संजय धारेराव, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कटके आणि त्यांच्या पथकाकडून हद्दीत गस्त घातली जात होती. या वेळी सानपाडा रेल्वे स्थानकसमोरील बस डेपो गेटजवळ फातिमा अल्लाउद्दीन शेख (वय ३९) ही महिला संशयास्पद हालचाली करताना आढळली. पोलिसांनी तत्काळ तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com