वायूगळतीने तारापुरात खळबळ

वायूगळतीने तारापुरात खळबळ
Published on

वायुगळतीने तारापुरात खळबळ
बगेरिया केमिकल कारखान्यातील घटना
बोईसर/तारापूर, ता. ३ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील डी-१७ भूखंडावरील बगेरिया केमिकल कारखान्यात सोमवारी दुपारी विषारी वायूच्या गळतीने खळबळ उडाली होती. या घटनेतील चौघा बाधितांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बोईसर एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक डी-१७ येथे मेसर्स भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड हा प्रामुख्याने डाय इंटरमीडिएट्स रसायनांच्या उत्पादन कंपनीपैकी एक आहे. सोमवारी (ता. २) दुपारी कारखान्यातील कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या ओलिअम रसायनाची गळती झाली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेली ही गळती नंतर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वातावरणातील हवेत सल्फर ट्रायऑक्साइड वायूचे दाट धुके पसरले होते. या धुरामुळे कारखान्याच्या परिसरात दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती. तसेच निर्माण झालेले धुके वाऱ्याच्या दिशेने एक किलोमीटरपर्यंत पसरले होते.
गळतीनंतर प्रशासनाने तातडीने परिसरातील इतर कारखान्यांमधील कामगारांना सुरक्षित स्थळी हलविले. मात्र, वायूच्या तीव्र परिणामांमुळे कामगारांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव जाणवल्याने जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
----------------------------------
१५८ कामगार सुरक्षित
कारखान्यात १५८ कामगार कार्यरत होते. सर्व कामगार सुरक्षित असून, त्यांना कोणतीही बाधा झालेली नाही. मात्र, या गळतीचा संपर्क रस्त्यावरून जाणाऱ्या चौघांना झाल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. या घटनेत कामगाराला किंवा नागरिकाला जीविताचा धोका निर्माण झालेला नाही. तसेच परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे, असे औद्योगिक सुरक्षा संचालनालयाने म्हटले आहे.
-------------------------------
संध्याकाळी परिस्थिती नियंत्रणात
परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याच्या मार्गदर्शनाखाली आरती ग्रुपचे रवी यादव, पंकज गौतम, राजेंद्र पवार, मुकेश कदम, संदीप पाटील, तसेच टिमा मार्गाचे रवी भावसार व अरुण सावंत, आरती फार्मा लॅबचे संदीप पाटील यांच्या पथकाने संध्याकाळी ६:३० वाजता परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com