पूरमुक्त वसई-विरारचा संकल्प
पूरमुक्त वसई-विरारचा संकल्प
बेकायदा भरावांवर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश
विरार, ता. ३ (बातमीदार) ः वसई-विरार शहरात पावसाळ्यातील पूरपरिस्थिती टाळण्यासाठी वसई-विरार शहर पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च करून नालेसफाई करण्यात येते; मात्र नैसर्गिक मार्ग बेकायदा भरावांमुळे अरुंद झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत.
आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी विधानसभेच्या २०२५च्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याच अनुषंगाने पालकमंत्री गणेश नाईक यांनी वन तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी कांदळवनाची स्थिती सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. तसेच कांदळवन पार्क निर्माण करण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने पाण्याच्या नैसर्गिक मार्गातील कांदळवनाच्या (मँग्रोव्ह) जागांची पाहणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. तसेच कांदळवन स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने सुरू करून त्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

