चिंचघरमध्ये पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी
चिंचघरमध्ये पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी
वाडा (बातमीदार) ः चिंचघर ग्रामपंचायतीच्या वतीने नारायणराव यशवंतराव भोईर स्मृती स्पर्धा परीक्षा वाचनालय व अभ्यासिका केंद्र चालवले जाते. या केंद्रामार्फत ग्रामस्थांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी, या उद्देशाने मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पुस्तकांवर बोलू काही’ हा उपक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी सीईओ भगीरथ भोईर, माजी उपव्यवस्थापक जाखडी, सरपंच प्रेमा नांगरे, माजी उपसरपंच मनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी पंढरीनाथ सासे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

