रस्त्यांसाठी अर्थसंकल्पीय तरतूदीची मागणी
रस्त्यांसाठी अर्थसंकल्पीय तरतूदीची मागणी
विरार, ता. ३ (बातमीदार)ः वसई-विरार पालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर करण्याबरोबरच सुरळीत वाहतुकीसाठी पूल, काँक्रीट रस्ते उभारण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राजन नाईक यांनी केली आहे. याबाबतचे पत्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठवले आहे.
वसई तालुक्याचे वेगाने नागरीकरण होत असून, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांची स्थिती चांगली नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात पूल, रस्त्यांसाठी १९ कोटींच्या तरतुदीला मान्यता मिळाल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल, असे आमदार राजन नाईक यांनी पत्रात म्हटले आहे. खार्डी-डोलीव रस्त्यावरील मोठ्या पुलासाठी पाच कोटी, वैतरणा स्थानक ते डोलीव गावापर्यंत काँक्रीट रस्त्यासाठी सहा कोटी ५० लाख, एसटी डेपो ते पारनाका-अर्नाळा-कनेर-शिरसाड-अंबाडी रस्त्यासाठी सात कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

