जोसेफ महाविद्यालयात शेतकरी मेळावा
जोसेफ महाविद्यालयात शेतकरी मेळावा
विरार (बातमीदार) ः विरार पश्चिमेकडील सत्पाळा येथील ज्ञानदीप मंडळ संचालित, सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ‘शेतीमधील नावीन्यपूर्ण उपक्रम काळाची गरज’ या विषयावर तसेच शासकीय योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून किरण संखे (मंडळ कृषी अधिकारी, वसई), हेमंत अधिकारी (सहाय्यक कृषी अधिकारी, पालघर जिल्हा), अपूर्वा बहुतुले (सहाय्यक कृषी अधिकारी, नाळे), दीपा राऊत (जिल्हा संसाधन प्रतिनिधी, पालघर), योगिता पवार (जिल्हा संसाधन प्रतिनिधी, पालघर) उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याला ज्ञानदीप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

