कापडाच्या गोदामाला भीषण आग

कापडाच्या गोदामाला भीषण आग

Published on

भिवंडीत कापडाच्या गोदामाला भीषण आग
सहा बकऱ्यांचा होरपळून मृत्यू; आगीत लाखो रुपयांचे नुकसान
भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) : भिवंडीतील कणेरी परिसरात एका कापडाच्या गोदामाला मंगळवारी (ता. ३) लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम खाक झाले आहे. या दुर्दैवी घटनेत गोदामात बांधून ठेवलेल्या सहा बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून, एका बकरीला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कणेरी येथील एका एकमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामात आज अचानक आग लागली. या गोदामात मोठ्या प्रमाणावर कपडे, चिंधी आणि धागा कोन (यार्न) साठवून ठेवला होता. ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात सापडले. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत गोदामातील लाखो रुपयांचा माल, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जळून भस्मसात झाली होती.

मुक्या प्राण्यांचा बळी
या भीषण आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी गोदामात बांधलेल्या सात बकऱ्यांपैकी सहा बकऱ्यांचा होरपळून अंत झाला. एका बकरीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस आणि अग्निशमन विभाग याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com