आधारवाडी कारागृहातील लाचखोरी उघड

आधारवाडी कारागृहातील लाचखोरी उघड

Published on

आधारवाडी कारागृहात लाचखोरी उघड
दोन कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात; कैद्याच्या भेटीसाठी मागितले दीड हजार

कल्याण, ता. ३ ः आधारवाडी कारागृहातील भ्रष्टाचाराचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. कारागृहातील एका बंदीची त्याच्या नातेवाइकांशी भेट घडवून देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन कर्मचाऱ्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे कारागृह वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारागृह सुभेदार सतीश भोसले (वय ५५), कारागृह शिपाई शरद पानपाटील (३९) यांना लाचखोरीप्रकरणी अटक केली.

आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला भेटण्यासाठी त्याचे नातेवाईक आले होते. नियमानुसार ही भेट होणे अपेक्षित असताना, सुभेदार सतीश भोसले आणि शिपाई शरद पानपाटील यांनी या भेटीच्या मोबदल्यात दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने नातेवाइकांनी तत्काळ ठाणे ‘एसीबी’ कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने कारागृह परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोन्ही कर्मचाऱ्यांना झडप घालून ताब्यात घेतले.

पुढील कायदेशीर प्रक्रिया
याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या प्रकरणाची अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com