मालवणीतील तुंबलेली गटारे अखेर स्वच्छ
मालवणीतील तुंबलेली गटारे अखेर स्वच्छ
मालाड, ता. ३ (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात तुंबलेल्या गटारांमुळे घाण पाणी थेट रहिवाशांच्या घरासमोर साचत असल्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. नवीन कलेक्टर कंपाउंड येथील गंगाराम रेशन दुकानालगतचा भाग या समस्येने अक्षरशः त्रस्त झाला होता. स्थानिक नागरिकांना अनेक दिवस या अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात १ मार्च रोजी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली. गटारांची स्वच्छता करून साचलेला गाळ उपसण्यात आला. त्यामुळे घाण पाण्याचा निचरा सुरळीत झाला असून, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सदर रस्ता अत्यंत अरुंद असल्याने परिसरातील नागरिकांना याच मार्गाने ये-जा करावी लागते. शेजारीच असलेल्या खासगी शाळेमुळे शेकडो विद्यार्थ्यांचाही दररोज याच रस्त्यावरून प्रवास होत असतो. रस्त्यावर साचलेले घाण पाणी आणि दोन्ही बाजूंना टाकून ठेवलेले पिण्याच्या पाण्याच्या पाइपांचे गठ्ठे यामुळे नागरिकांना अक्षरशः पाइपांवरून तोल सांभाळत चालावे लागत होते. पालिकेच्या पी उत्तर विभागातील मेंटेनन्स खात्याचे अधिकारी प्रतीक वाघमारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांकडून तत्काळ कारवाई केली. संबंधित भागातील गटारे स्वच्छ करण्यात आल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

