जोगेश्वरी कोकणनगरात गटारे तुंबली

जोगेश्वरी कोकणनगरात गटारे तुंबली

Published on

जोगेश्वरी कोकणनगरात गटारे तुंबली; रस्त्यावर सांडपाणी, नागरिक त्रस्त
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्व येथील कोकणनगर परिसरातील नवशक्ती क्रीडा मंडळाजवळ, एमएचबी कॉलनी भागात भूमिगत मैला वाहून नेणारी गटारे तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे. परिणामी संपूर्ण रस्त्यावर घाणेरडे पाणी साचून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत.
गटारे भरल्याने मैला-मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः त्रास सहन करावा लागत असून, अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे के-पूर्व विभागाच्या घनकचरा व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून परिसरातील सर्व भूमिगत गटारे स्वच्छ करावीत आणि सांडपाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com